रंगारंग ‘किक आॅफ’!

By Admin | Updated: June 13, 2014 04:30 IST2014-06-13T04:30:17+5:302014-06-13T04:30:17+5:30

साऱ्या जगाचे आकर्षण असलेला आणि दर चार वर्षांनी येणारा फुटबॉलचा ‘महाकुंभ’ अर्थात फुटबॉल वर्ल्डकपचे गुरुवारी शानदार ‘किक आॅफ’ झाले

Colorful 'Kick of'! | रंगारंग ‘किक आॅफ’!

रंगारंग ‘किक आॅफ’!

साओ पावलो : साऱ्या जगाचे आकर्षण असलेला आणि दर चार वर्षांनी येणारा फुटबॉलचा ‘महाकुंभ’ अर्थात फुटबॉल वर्ल्डकपचे गुरुवारी शानदार ‘किक आॅफ’ झाले. नेत्रदीपक उद्घाटनानंतर खेळविण्यात आलेल्या ब्राझील- क्रोएशिया सलामी लढतीने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. ६८ हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत अरेना कोरिन्थियान्स स्टेडियमवर जवळपास अडिच तास रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यात ६०० कलावंतांनी ब्राझीलच्या सांस्कृतिक परंपरेचे मनोहारी दर्शन घडवले. प्रख्यात अभिनेत्री जेनिफर लोपेझ, रॅपर पिटबुल आणि ब्राझीलची गायिका क्लॉडिया लिटे यांच्या गायन आणि नृत्याविष्कारावर साऱ्या जगाने ताल धरला. हा सर्वांत मोठा क्रीडा उत्सव तब्बल महिनाभर चालणार आहे. एकाहून एक सरस सामन्यांचा थरार ३२ संघांच्या साक्षीने शिगेला पोहोचणार असून १३ जुलैच्या अंतिम लढतीपर्यंत हा थरार कायम राहील.

Web Title: Colorful 'Kick of'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.