आयव्हरी कोस्टसमोर कोलंबियाची बाजू वरचढ

By Admin | Updated: June 19, 2014 03:37 IST2014-06-19T03:18:47+5:302014-06-19T03:37:52+5:30

उद्या होणाऱ्या विश्वचषक लढतीत कोलंबियाचा सामना आयव्हरी कोस्टचा वेगवान खेळ आणि शक्तीशी होणार आहे. ग्रुप सी गटाच्या या लढतीत या दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली होती

Colombia's stand in front of the Ivory Coast | आयव्हरी कोस्टसमोर कोलंबियाची बाजू वरचढ

आयव्हरी कोस्टसमोर कोलंबियाची बाजू वरचढ

ब्रासिलिया : उद्या होणाऱ्या विश्वचषक लढतीत कोलंबियाचा सामना आयव्हरी कोस्टचा वेगवान खेळ आणि शक्तीशी होणार आहे.
ग्रुप सी गटाच्या या लढतीत या दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली होती. कोलंबियाने ग्रीसला ३-0ने पराभूत केले होते, तर आयव्हरी कोस्टने जपानला २-१ ने धूळ चारली होती.
आयव्हरी कोस्टविरुद्ध जपानचा वेगवान आणि जोशीला खेळ चालू शकला नाही; परंतु कोलंबियाचा मिडफिल्डर फ्रेडी गुआरिनने त्यांचा संघ चेंडूवर कब्जा मिळवून आयव्हरी कोस्टच्या क्षमतेचा मुकाबला करेल, असे म्हटले. इंटरमिलानच्या या खेळाडूने कोलंबिया संघ शारीरिक रूपाने मजबूत आपल्या प्रतिस्पर्धी कोलंबियाशी दोन हात करण्यास सज्ज असल्याचे म्हटले. तो म्हणाला, हा संघ शारीरिकरूपाने मजबूत आहे आणि ते सहजपणे चेंडूंवर कब्जा मिळू देणार नाहीत; परंतु आमची जमेची बाजू ही चेंडूवर नियंत्रण ठेवणे आणि पासिंग ही आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध व्यूहरचना आखली आहे. आम्हाला चतुराईने खेळावे लागेल आणि पूर्ण आत्मविश्वासाने आम्ही मैदानात उतरू.
या सामन्यात विजय मिळवणारा संघाचा जवळपास अंतिम १६ जणांतील प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जपान आणि ग्रीस यांच्यातील निर्णयावरही हा प्रवेश अवलंबून आहे. आयव्हरी कोस्ट दिदिएर ड्रोग्बावर आक्रमणाची धुरा सोपवू शकतो. त्याला जपानविरुद्ध सब्स्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानावर उतरवण्यात आले होते. आयव्हरी कोस्टचे प्रशिक्षक साबरी लामाउची यांनी ड्रोग्बाच्या उपस्थितीने पहिल्या सामन्यात संघाच्या कामगिरीवर खूप परिणाम झाला. ते म्हणाले, ‘‘त्याच्या येण्याने खेळाचे चित्रच पालटले. दोन-तीन खेळाडू त्याला रोखत होते आणि त्याचा संघाला फायदा झाला.’’ गत दोन विश्वचषकात पराभवाने सुरुवात करणाऱ्या संघाने या वर्षी विजयाने सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Colombia's stand in front of the Ivory Coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.