सुपर ओव्हरमध्ये कोब्राचा विजय
By Admin | Updated: September 27, 2014 02:21 IST2014-09-27T02:21:05+5:302014-09-27T02:21:05+5:30
१७४ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना केप कोब्राने लढाऊवृत्तीचा नजराणा पेश करून सामना बरोबरीत सोडवला.

सुपर ओव्हरमध्ये कोब्राचा विजय
मोहाली : १७४ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना केप कोब्राने लढाऊवृत्तीचा नजराणा पेश करून सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये कोब्राने विजयासाठी ठेवलेल्या ११ धावांचा पाठलाग करताना बारबाडोसला अपयश आले आणि चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतील ही लढत कोबराने जिंकली.
बारबाडोस ट्रायडेंट संघाला दिलेले फलंदाजीचे आमंत्रण दिलशान मुनाविरा आणि जॉनथन कार्टर यांच्या दमदार फटकेबाजीच्या बळावर सक्षमपणे स्वीकारले. या दोघांच्या लढाऊ बाण्याने ट्रायडेंट संघासाठी निर्धारित २० षटकांत ८ बाद १७४ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर चार्ल लॅगेंवेल्ड् याने सलामीवीर शेन डॉवरिक याला शून्यावर माघारी धाडून संघाला पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ तिसऱ्याच षटकांत रेमन रैफर हाही धावबाद झाल्याने ट्रायडेंट्सची अवस्था २ बाद ७ धावा अशी झाली होती; पण मुनाविरा आणि जॉनथन कार्टर यांनी संघाची धुरा सांभाळली. (वृत्तसंस्था)