प्रशिक्षक समन्वय साधणारा असावा - कपिल
By Admin | Updated: May 26, 2015 01:51 IST2015-05-26T01:51:01+5:302015-05-26T01:51:01+5:30
प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी हे महत्त्वाचे नसून खेळाडूंशी चांगला समन्वय साधणारा किंवा खेळाडूंना जवळचा वाटणारा असा प्रशिक्षक असावा,

प्रशिक्षक समन्वय साधणारा असावा - कपिल
मुंबई : प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी हे महत्त्वाचे नसून खेळाडूंशी चांगला समन्वय साधणारा किंवा खेळाडूंना जवळचा वाटणारा असा प्रशिक्षक असावा, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.
मुंबईत सोमवारी एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये वार्षिक सिएट क्रिकेट रेटींग पुरस्कार सोहळा पार पडला. दरम्यान कपिल देव यांना आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २०१४-१५ सालातील कामगिरी लक्षात घेऊन श्रीलंकेच्या कुमार संगकाराला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने आणि युवा अजिंक्य रहाणे याला सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचा प्रशिक्षक देशी असावा की परदेशी याविषयी कपिल म्हणाले की, परदेशी प्रशिक्षकाच्या बाबतीत खुपवेळा भाषेची अडचण असते. तीच स्थिती त्या प्रशिक्षकाची देखील होते. कारण त्यांना भारतीय भाषा अवगत नसते, यामुळे संघाचा समतोल राखण्यात अडचण येऊ शकते. जर का देशी प्रशिक्षक असेल तर संघातील प्रत्येक खेळाडूला त्या प्रशिक्षकासोबत मनमोकळेपणाने बोलता येते. अर्थात परदेशी प्रशिक्षकासोबत देखील प्रत्येक खेळाडू मोकळेपणाने बोलू शकतो. मात्र यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे, असेही कपिल यांनी सांगितले.
विजेते खेळाडू:
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू:
कुमार संगकारा (श्रीलंका)
सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू : अजिंक्य रहाणे
आंतरराष्ट्रीय फलंदाज :
हाशिम आमला (द. आफ्रिका)
आंतरराष्ट्रीय गोलंदाज :
रंगणा हेराथ (श्रीलंका)
सर्वोत्तम टी-२० खेळाडू :
ड्वेन ब्रावो (वेस्ट इंडिय्ज)
लोकप्रिय क्रिकेटपटू :
किरॉन पोलर्ड (वेस्ट इंडिज)
विशेष पुरस्कार :
रोहित शर्मा (भारत)
सर्वोत्तम देशांतर्ग क्रिकेटपटू :
आर. विनय कुमार (कर्नाटक - कर्णधार)
उदयोन्मुख खेळाडू : दीपक हूडा