‘शटल टाइम’ला प्रशिक्षकांचा पाठिंबा
By Admin | Updated: February 25, 2017 04:02 IST2017-02-25T04:02:15+5:302017-02-25T04:02:15+5:30
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) वतीने शालेय खेळाडूंना बॅडमिंटन खेळाचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शटल टाइम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘शटल टाइम’ला प्रशिक्षकांचा पाठिंबा
मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) वतीने शालेय खेळाडूंना बॅडमिंटन खेळाचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शटल टाइम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीनदिवसीय उपक्रमात स्थानिक बॅडमिंटन प्रशिक्षकांसह ३० शाळांतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी हजेरी लावली.
भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बीएआय) सहकार्याने वरळी येथील एनएससीआय क्लबवर नुकताच हा उपक्रम पार पडला. शालेय बॅडमिंटनपटू घडवण्यासाठी तंत्रशुद्ध आणि अत्याधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याने शाळेतील प्रशिक्षकांसाठी एमबीएने या उपक्रमाचे आयोजन केले होते. सहभागी प्रशिक्षकांना जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) अधिकृत नियमांप्रमाणे प्रशिक्षण देऊन सहभागी प्रशिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
‘यशस्वी खेळाडू घडण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहेच, मात्र त्याचबरोबर शालेय स्तरावरही अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणे तेवढेच आवश्यक आहे. जागतिक महासंघाच्या शटल टाइम उपक्रमामुळे बॅडमिंटन खेळाचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फायदा खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना होईल,’ असे मत महिला एकेरीत नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या अर्पणा पोपटने या वेळी व्यक्त केले. (क्रीडा प्रतिनिधी)