नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे माजी तेजतर्रार गोलंदाज अल्फोंसो थॉमस हे आयपीएलच्या आगामी सत्रासाठी दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक असतील.थॉमस यांनी पाकिस्तानविरुद्ध २00७ मध्ये एकमेव टी-२0 आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही; परंतु ते आयपीएल, बिग बॅश, इंग्लिश टी-२0 आणि बीपीएलसारख्या लीगमध्ये खेळलेले आहेत.आयपीएलमध्ये ते पुणे वॉरियर्स संघाचे सदस्य होते. त्यांनी २१४ टी-२0 सामन्यांत २४८ विकेट्स घेतल्या आहेत. दिल्ली डेअर डेव्हिल्सनुसार थॉमस वेगवान गोलंदाजांसोबत छोट्या करारावर काम करतील. मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणाले, आम्ही अल्फोंसोची सेवा घेऊन खूप खूश आहोत. त्यांना टी-२0 चे खूप ज्ञान आहे. त्यांचा अनुभव आमच्या गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.थॉमस म्हणाले, ‘‘मी आयपीएल खेळण्याचा पूर्ण आनंद घेतला आहे. आता दिल्ली डेअर डेव्हिल्सबरोबर प्रशिक्षक म्हणून विशेष अनुभव असेल. गॅरीने जेव्हा माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला, तेव्हा मी तत्काळ तो स्वीकारला. (वृत्तसंस्था)संघात जहीर खान आणि अॅल्बी मॉर्कलसारख्या अनुभवी गोलंदाजांबरोबर मोहम्मद शमी, नाथन कुल्टर नाईल आणि गुरिंदर संधू यांच्यासारखे युवा गोलंदाज आहेत. त्यांच्याबरोबर काम करणे रोमहर्षक ठरेल.’’ सेरेनाचा ७00 वा विजयकी बिस्केने : सात वेळेसची चॅम्पियन सेरेना विल्यम्सने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करतानाच डब्ल्यूटीए सर्किटमध्ये तिच्या कारकिर्दीतील ७00 व्या विजयाची नोंद केली.सेरेना विल्यम्सने सबाइन लिसिकी हिचा ७-६, १-६, ६-३ असा पराभव केला. या स्पर्धेतील सेरेनाचा हा सलग १६ वा विजय होता.आता तिची लढत जगातील तृतीय मानांकित खेळाडू सिमोना हालेप हिच्याविरुद्ध होईल. सिमोना हालेप हिने अमेरिकेच्या मानांकित स्लोएने स्टिफेन्सचा ६-१, ७-५ असा पराभव केला. दरम्यान, जागतिक क्रमवारीतील नवव्या मानांकित खेळाडू आंद्रिया पेत्कोविच दुसऱ्या उपांत्य फेरीत कार्ला सुआरेज नवारोविरुद्ध खेळेल.पुरुष गटात दोन वेळेसचा चॅम्पियन अँडी मरे याने अमानांकित डोमेनिक थियेमचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. आता त्याची लढत थॉमस बर्डीच आणि जुआन मोनाको यांच्यात विजयी होणाऱ्या खेळाडूविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)
द. आफ्रिकेचे थॉमस दिल्लीचे प्रशिक्षक
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST