‘क्लीन स्वीप’ची उत्सुकता

By Admin | Updated: November 16, 2014 01:29 IST2014-11-16T01:29:36+5:302014-11-16T01:29:36+5:30

चारही सामन्यांत सहज विजयाची नोंद करणारा यजमान भारतीय संघ रविवारी खेळल्या जाणा:या पाचव्या व अखेरच्या सामन्यात विजय मिळवित ‘क्लीन स्वीप’ करण्यास उत्सुक आहे.

'Clean sweep' curiosity | ‘क्लीन स्वीप’ची उत्सुकता

‘क्लीन स्वीप’ची उत्सुकता

 वनडे मालिका : श्रीलंकेविरुद्ध पाचवी व अंतिम लढत आज 

 
रांची : मालिकेतील यापूर्वीच्या चारही सामन्यांत सहज विजयाची नोंद करणारा यजमान भारतीय संघ रविवारी खेळल्या जाणा:या पाचव्या व अखेरच्या सामन्यात विजय मिळवित ‘क्लीन स्वीप’ करण्यास उत्सुक आहे.
विश्वकप स्पर्धेला 1क्क् दिवसांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असून, श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयामुळे उंचावलेले मनोधैर्य कायम राखण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत 5-क्ने विजय मिळविण्याच्या निर्धाराने रविवारी मैदानात उतरणार आहे. 
पहिल्या तीन सामन्यांत सहज विजयाची नोंद करणा:या भारतीय संघासाठी चौथी लढत ऐतिहासिक ठरली. चौथ्या सामन्यात रोहित शर्माने 264 धावांची ऐतिहासिक खेळी करीत विक्रम नोंदविला. रोहितच्या विक्रमी खेळीच्या भरवशावर भारताने चौथ्या सामन्यात 153 धावांनी दमदार विजय मिळविला. 
सलग पराभव स्वीकारणा:या श्रीलंका संघाचा कर्णधार अॅन्जेलो मॅथ्यूजने संघासाठी काहीच सकारात्मक बाब घडत नसल्याचे कबूल केले. भारतीय संघाविरुद्ध श्रीलंका संघाला एकाही लढतीत तुल्यबळ खेळ करता न आल्यामुळे, मॅथ्यूज निराश झाला आहे. वेगवान गोलंदाजीचा विचार करता लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंका संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली आहे. क्षेत्ररक्षणही लौकिकाला साजेसे झाले नाही. 
रोहित शर्मा या मालिकेत शतक झळकाविणारा भारताचा तिसरा सलामीवीर ठरला. रहाणो व धवन या सलामीवीरांप्रमाणो रोहितही डावाच्या सुरुवातीला नशिबवान ठरला. रोहित वैयक्तिक 4 धावांवर असताना थिसारा परेराने त्याचा सोपा ङोल सोडला. रोहितचा हा ङोल श्रीलंका संघाला महागडा ठरला.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांच्या मालिकेत बोटाला दुखापत झाल्यानंतर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. त्याने श्रीलंकेविरुद्ध विक्रमी खेळी करीत दमदार पुनरागमन केले. रोहित मालिकेतील पहिल्या तीन लढतीत सहभागी झाला नव्हता, पण चौथ्या सामन्यात त्याला शिखर धवनच्या स्थानी संधी मिळाली. त्याने मिळालेल्या संधीचे सोने करताना द्विशतकी खेळी केली. 1क्क् चेंडूंमध्ये 1क्क् धावा फटकाविणा:या रोहितने त्यानंतरच्या 164 धावा केवळ 73 चेंडूंमध्ये फटकाविल्या. 
रोहितच्या खेळीमुळे श्रीलंका संघ धास्तावला आहे. या मालिकेत भारताच्या आघाडीच्या फळीतील सर्वच फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सलामीवीर अजिंक्य रहाणो व तिस:या क्रमांकावरील अंबाती रायडू यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कर्णधार विराट कोहलीने संघसहका:यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी परिपक्वता दाखविली आहे. गेल्या सामन्यात 66 धावांची खेळी करणा:या कोहलीने रोहितला अधिक वेळ स्ट्राईक देण्याची भूमिका बजावली. या दोघांनी 2क्2 धावांची भागीदारी केली. 
गोलंदाजीमध्ये उमेश यादवने सर्वाधिक 1क् बळी घेत चमकदार कामगिरी केली आहे. फिरकीपटू अक्षर पटेलने चार लढतीत 9 बळी  घेतले आहेत. (वृत्तसंस्था)
 
उभय संघ 
यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, अंबाती रायडू, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, विनयकुमार, स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा, अक्षर पटेल आणि केदार जाधव.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, लाहिरू तिरिमाने, माहेला जयवर्धने, दिनेश चांदीमल, अशान प्रियांजन, निरोशन डिकलोवा, तिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, लाहिरू गमागे, चतुरंगा डिसिल्व्हा, 
सीकुगे प्रसन्ना, अजंता मेंडिस आणि शमिंडा इरांगा.

Web Title: 'Clean sweep' curiosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.