क्लार्कवर आज होणार शस्त्रक्रिया

By Admin | Updated: December 16, 2014 01:22 IST2014-12-16T01:22:05+5:302014-12-16T01:22:05+5:30

आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कच्या हॅमस्ट्रिंगवर मंगळवारी शस्त्रक्रिया होेणार आहे. क्लार्कने अलीकडेच म्हटले होते की, ‘दुखापतीमुळे भविष्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.’

Clark will be going on today's surgery | क्लार्कवर आज होणार शस्त्रक्रिया

क्लार्कवर आज होणार शस्त्रक्रिया

ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कच्या हॅमस्ट्रिंगवर मंगळवारी शस्त्रक्रिया होेणार आहे. क्लार्कने अलीकडेच म्हटले होते की, ‘दुखापतीमुळे भविष्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.’
आॅस्ट्रेलिया संघाचे डॉक्टर पीटर बु्रकनर म्हणाले, ‘सोमवारी सायंकाळी एका सर्जनने मायकलची तपासणी केली असून, उद्या शस्त्रक्रिया करण्यात येईल. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमध्ये नेहमी शस्त्रक्रियेची गरज भासत नाही, पण मायकलच्या हॅमस्ट्रिंगचा महत्त्वाचा भाग दुखावला आहे. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करणे सर्वोत्तम पर्याय आहे. शस्त्रक्रियेनंतर दुखापतीतून सावरताना त्याची प्रगती कशी होते, यावर पुनरागमनाचा कालावधी अवलंबून आहे.’

Web Title: Clark will be going on today's surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.