वॉर्नरविरुद्ध पुरावे असल्याचा दावा
By Admin | Updated: June 9, 2015 02:10 IST2015-06-09T02:10:03+5:302015-06-09T02:10:03+5:30
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि महासंघाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांच्यादरम्यान एक कोटी डॉलर्स रकमेचा व्यवहार झाल्याचा पुरावा असल्याचा दावा केला आहे.

वॉर्नरविरुद्ध पुरावे असल्याचा दावा
लंडन : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि महासंघाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांच्यादरम्यान एक कोटी डॉलर्स रकमेचा व्यवहार झाल्याचा पुरावा असल्याचा दावा केला आहे. यामुळे माजी पदाधिकारी आणखी अडचणीत सापडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एक ब्रिटिश न्यूज चॅनलने दावा केला आहे, की वॉर्नर यांनी या रकमेचा उपयोग वैयक्तिक कर्ज व स्वहितासाठी केला आहे. फिफाच्या खात्यातून एक कोटी डॉलर्सची रक्कम एकूण तीन टप्प्यांमध्ये वॉर्नर यांचे नियंत्रण असलेल्या कोन्काकाफ संघाच्या खात्यात वळती करण्यात आली असल्याची कागदपत्रं आमच्याकडे आहेत. फिफाच्या खात्यातून ही रक्कम जानेवारी २००८ ते मार्च २००९ या कालावधीत वळती करण्यात आली. सर्वांत मोठी रक्कम फेब्रुवारी २००८ मध्ये १३ लाख ६५ हजार डॉलर्स या खात्यात वळती करण्यात आली. स्वित्झर्लंड व अमेरिकेच्या चौकशी विभागांनी गेल्या आठवड्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फिफाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर चार दिवसांनी फिफाच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा निवड झालेल्या सेप ब्लाटर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अमेरिकेच्या जेरोम वाल्के यांनी दक्षिण आफ्रिकेला दिलेल्या एक कोटी डॉलर्सच्या लाच प्रकरणात वॉर्नर यांच्या भूमिकेबाबत कल्पना असल्याची कबुली दिली होती.