म्यानमार विजयाचा दावेदार : कॉन्सेटाईन

By Admin | Updated: March 27, 2017 00:56 IST2017-03-27T00:56:24+5:302017-03-27T00:56:24+5:30

भारताच्या म्यानमारविरुध्द मंगळवारी होणाऱ्या सामन्यात म्यानमार विजयाचा दावेदार असेल असे मत भारताचे

Claimer of Myanmar victory: Constantine | म्यानमार विजयाचा दावेदार : कॉन्सेटाईन

म्यानमार विजयाचा दावेदार : कॉन्सेटाईन

यांगून : भारताच्या म्यानमारविरुध्द मंगळवारी होणाऱ्या सामन्यात म्यानमार विजयाचा दावेदार  असेल असे मत भारताचे
मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेटाईन यांनी आज व्यकत केले. म्यानमारचा संघ गेले काही दिवस एकत्र  आहेत, शिवाय त्यांना मायदेशात प्रेक्षकांचा पाठिंबा असेल.
या दोन संघात यापूर्वी झालेल्या सामन्यात म्यानमारने भारताला १-0 ने हरवले होते. एएफसी आशियाई चषक पात्रता सामन्यापूर्वी कॉन्स्टेटाईन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मायदेशात खेळताना प्रत्येक संघ त्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा उठवतो. ते  गेले काही दिवस एकत्र असल्याने  ते एकमेकांचा खेळ चांगल्याप्रकारे जाणून आहेत. ते खूप कष्ट  घेतात आणि सामन्यात प्रतिस्पर्ध्याला दबावात आणतात.  (वृत्तसंस्था)

Web Title: Claimer of Myanmar victory: Constantine