अमेरिका, जर्मनीमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस
By Admin | Updated: June 26, 2014 02:02 IST2014-06-26T02:02:16+5:302014-06-26T02:02:16+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी अमेरिका आणि जर्मनी संघ एकमेकांशी झुंजतील़ या लढतीत विजय मिळूवन अव्वल स्थान पटकावण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य राहील़

अमेरिका, जर्मनीमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस
>रोसिफे : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी अमेरिका आणि जर्मनी संघ एकमेकांशी झुंजतील़ या लढतीत विजय मिळूवन अव्वल स्थान पटकावण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य राहील़
या गटात जर्मनी एक विजय आणि एका ड्रॉसह गुणतालिकेत नंबर वन, तर अमेरिका 4 गुणांसह गोलच्या सरासरीनुसार दुस:या क्रमांकावर विराजमान आह़े या दोन्ही संघांतील सामना ड्रॉ राहिल्यास त्यांचा बाद फेरीत प्रवेश निश्चित होईल़ मात्र, बाद फेरीत अनुभवी बेल्जियमविरुद्धच्या सामन्यापासून वाचण्यासाठी अमेरिका आणि जर्मनीला गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहणो गरजेचे आह़े अमेरिकेचे प्रशिक्षक जुर्गेन क्लिसमॅन म्हणाले, ‘‘दोन्ही संघांत रंगतदार लढत होईल, यात शंका नाही़ आम्ही जर्मनीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी विशेष मेहनत घेऊ, जेणोकरून अंतिम 16 संघांत आमची स्थिती अधिक मजबूत होण्यास मदत होईल़’’