चुरशीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विजयी
By Admin | Updated: April 10, 2015 00:00 IST2015-04-09T23:43:09+5:302015-04-10T00:00:51+5:30
चिदंबरम येथील मैदानावर होणारा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा होता. दिल्ली डेअरव्हिल्सचे ९ गडी बाद झाले असतानाही मॉर्कोलेच्या तडाखेबंद फलंदाजीने सामना
चुरशीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विजयी
>
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ९ -
एका धावेच्या फरकाने चेन्नई सुपरकिंग्जने सामना खिशात घातला.
चिदंबरम येथील मैदानावर होणारा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा होता. दिल्ली डेअरव्हिल्सचे ९ गडी बाद झाले असतानाही मॉर्कोलेच्या तडाखेबंद फलंदाजीने सामना दिल्ली डेअरव्हिल्स जिंकेल असे वाटत होते. एका चेंडूत षटकार हवा असताना मार्कोलेने चौकार मारल्याने हा सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकला. या सामन्यात महेंद्र सिंग धोनीने दोन षटकार लगावत उल्लेखनीय खेळ केल्याबद्दल त्याला गौरवण्यात आले. तसेच चार षटकांत २५ धावा देत नेहराने ३ गडी बाद केल्याबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दिल्ली डेअरव्हिल्सचा फलंदाज मार्कोलेने तब्बल ८ चौकार व एक षटकार लगावत ५५ चेंडूत ७३ धावा केल्या. चेन्नईच्याच मैदानावर झालेला सामना चेन्नई सुपरकिंग्जने जिंकल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांनी आनंद साजरा केला.