शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

ख्रिस्टियन एरिक्सन मृत्यूच्या दाढेतून परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 04:55 IST

फुटबॉलपटूचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरचा अनुभव

कोपनहेगन : ‘एक क्षण वाटले, एरिक्सन गेला. २९ वर्षांच्या ख्रिस्टियन एरिक्सनला मैदानावर हृदयविकाराचा जबर धक्का बसल्याने तो चक्क कोसळला. आम्ही त्याला गमावण्याच्या किती जवळ होतो हे सांगू शकणार नाही मात्र त्वरित उपचारांमुळे त्याला मृत्यूच्या दाढेतून अक्षरश: कसे खेचून आणले.’  हा थरार डेन्मार्क संघाचे डॉक्टर मॉर्टेन बोएसेन यांनी कथन केला आहे.युरो चषकात फिनलँडविरुद्धच्या सामन्यात शनिवारी बेशुद्धावस्थेत मैदानावर कोसळल्यानंतर एरिक्सनचे प्राण वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. एरिक्सनची नाडीपरीक्षा केल्यानंतर फार कमी वेळ आहे, हे बोएसेन यांच्या ध्यानात आले. ‘सुरुवातीला तो श्वास घेत होता, त्यामुळे त्याची नाडी तपासता आली, पण नंतर त्याची प्रकृती ढासळत गेली. प्रत्येक खेळाडूला संकटाची चाहूल लागली होती. हृदयगती बंद पडल्यासारखे जाणवताच डेफिब्रिलेटर या यंत्राच्या सहायाने आम्ही त्याच्या छातीवर दाब देण्यास सुरुवात केली,’ असे बोएसेन म्हणाले.

 एरिक्सनची प्रकृती स्थिरडेन्मार्कचा मधल्या फळीतील खेळाडूृ एरिक्सनची प्रकृती स्थिर असल्याचे डेन्मार्क फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. त्याच्यासोबत आम्ही सकाळीच बोललो, त्याने सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर असली तरी पुढील तपासण्यांसाठी त्याला रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे,’’ असे महासंघाने कळविले आहे.

सहकाऱ्यांनी डोळ्यात साठवले अश्रूपुढील १० मिनिटे भीतीदायक होती. एरिक्सनवर विविध उपचार करण्यात येत होते. डेन्मार्कच्या खेळाडूंनी आपले अश्रू डोळ्यांतच साठवून ठेवले. त्यांनी एरिक्सनभोवती उभे राहत होणारे उपचार कुणालाही कळू दिले नाहीत. एरिक्सनची पत्नी सबरिनाला डेन्मार्कचा कर्णधार सिमॉन जाएर व गोलरक्षक कास्पेर श्मेइचेल यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शुद्धीवर आल्यानंतर एरिक्सनला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले, तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. ‘वैद्यकीय पथक व अन्य सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे एरिक्सनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणण्यात आम्हाला यश आले,’असेही बोएसेन यांनी सांगितले.

टॅग्स :Footballफुटबॉल