ख्रिस गेल - विराट कोहलीचा धम्माल डान्स

By Admin | Updated: April 29, 2016 19:20 IST2016-04-29T19:10:35+5:302016-04-29T19:20:52+5:30

सध्या आयपीएलचे नववे पर्व सुरु आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आहेच. मात्र त्यांच्या फटकेबाजीनंतर त्यांची एक वेगळी

Chris Gayle - Virat Kohli's Dhammal Dance | ख्रिस गेल - विराट कोहलीचा धम्माल डान्स

ख्रिस गेल - विराट कोहलीचा धम्माल डान्स

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - सध्या आयपीएलचे नववे पर्व सुरु आहे. त्यामुळे  क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आहेच. मात्र त्यांच्या फटकेबाजीनंतर त्यांची एक वेगळी आणि हटकेबाज शैली आपल्याला पाहायला मिळाली तर नवलच वाटेल. 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ख्रिस गेल आणि विराट कोहली चक्क एका डान्स फ्लोअरवर थिरकले आहेत. विराट कोहलीला डान्स काही नवा नाही, त्याने याआधीही क्रिकेटर रोहित शर्माच्या संगीत सोहळ्यादरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत 'साडी के फॉल सा' या गाण्यावर डान्स केला होता. मात्र, गेल्या काही दिवसापूर्वी पिता बनलेल्या ख्रिस गेल याने एका कार्यक्रमादरम्यान, विराट कोहलीसोबत बेभान होऊन डान्स केला. या त्यांच्या डान्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, त्यांच्या डान्सच्यावेळी शेन वॉटसनने गिटार वाजवून त्यांना साथ दिली. तसेच, या कार्यक्रमातील एक व्हिडिओ एबी डिलीव्हर्सने ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

Web Title: Chris Gayle - Virat Kohli's Dhammal Dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.