ख्रिस गेल हा टी-२० चा ‘बादशहा

By Admin | Updated: May 14, 2016 01:49 IST2016-05-14T01:49:42+5:302016-05-14T01:49:42+5:30

ख्रिस गेल याचा सन्मान करण्याची ८८०० कारणे आहेत. टी-२० त त्याने इतक्याच धावा केल्या. यात टी-२० तील १७ शतकांचा समावेश आहे हे विशेष. तो नावानेच नव्हे, तर स्वभावानेदेखील या प्रकारात बादशहा आहेच

Chris Gayle is the 'T20 champion' | ख्रिस गेल हा टी-२० चा ‘बादशहा

ख्रिस गेल हा टी-२० चा ‘बादशहा

’एबी डिव्हिलियर्स लिहितो़ -

ख्रिस गेल याचा सन्मान करण्याची ८८०० कारणे आहेत. टी-२० त त्याने इतक्याच धावा केल्या. यात टी-२० तील १७ शतकांचा समावेश आहे हे विशेष. तो नावानेच नव्हे, तर स्वभावानेदेखील या प्रकारात बादशहा आहेच. २०११ मध्ये डर्क नानेस जखमी होताच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुत दाखल झालेला गेल संघाचा सुपरस्टार बनला.
आयपीएलच्या सुरुवातीच्या सत्रात तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये होता. त्यावेळी १४१.५९ च्या सरासरीने ४६३ धावा केल्या; पण २०११ च्या लिलावात त्याला कुणी गिऱ्हाईकच मिळाला नाही. त्याचे बेस प्राईज होते चार लाख डॉलर. आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे संपूर्ण स्पर्धेत खेळणे निश्चित नव्हते, असे मला आठवते. त्यानंतर गेल आरसीबीत दाखल झाला. तेव्हापासूनचा इतिहास आपल्यापुढे आहे. सामन्यागणिक आणि षटकागणिक त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार ठोकला आहे. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्याने टी-२०चा तो निर्विवाद बादशहा बनला.
आयपीएलमधील त्याची आकडेवारी बोलकी आहे. २०११ मध्ये त्याने आरसीबीसाठी ६०८ धावा केल्या. २०१२ मध्ये ७३३ आणि २०१३ साली ७०८ धावा केल्या. २०१४ मध्ये गेल केवळ ९६ धावा काढू शकला. २०१५ मध्ये गेलने ४९१ धावांचे संघाला योगदान दिले. या कालावधीत आयपीएल जिंकू न शकल्याचे शल्य माझ्यासह सर्वांना आहेच. पण, चिन्नास्वामीसह अन्य मैदानांवरदेखील आम्ही कडवा प्रतिकार करीत शानदार क्रिकेट खेळलो हे सत्य आहे. प्रत्येक वेळी गेल हाच आकर्षणाचे केंद्र होता. २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धची त्याची खेळी आयपीएल इतिहासातील सर्वांत मोठी वैयक्तिक खेळी ठरली.
या मोसमात अपेक्षेनुसार खेळ तो करू शकला नाही. पण, फॉर्म ‘टेम्पररी’ असतो हे विसरू नका. क्लास मात्र ‘परमनंट’ असतो. गेल नेहमीच सांघिक खेळाडू राहिला. तो नेहमी चांगल्याच मूडमध्ये असतो. संघात नवी ऊर्जा आणण्याचे काम तोच करतो. गेल टी-२० चा बादशाह आहे आणि नेहमीच राहणार. (टीसीएम)

Web Title: Chris Gayle is the 'T20 champion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.