टी - 20 मध्ये ख्रिस गेलनं रचला इतिहास
By Admin | Updated: April 18, 2017 21:00 IST2017-04-18T20:54:22+5:302017-04-18T21:00:39+5:30
ख्रिस गेल नावाच्या वादळाने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. ख्रिस गेल आयपीएल सामन्यादरम्यान टी-20 मध्ये 10000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

टी - 20 मध्ये ख्रिस गेलनं रचला इतिहास
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 18 - ख्रिस गेल नावाच्या वादळाने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. आयपीएल सामन्यादरम्यान टी-20 मध्ये 10000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा स्फोटक फलंदाज असलेल्या ख्रिस गेलने गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला. गुजरात लायन्स विरुद्ध खेळताना 37 वर्षीय ख्रिस गेलने तीन धावा काढून आपल्या टी-20 च्या कारकिर्दितील 10000 धावांचा टप्पा गाठला आणि विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
ख्रिस गेल आत्तापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये जवळपास 20 संघाकडून खेळला आहे. यामध्ये बारिसाल बुल्स, बारिसाल बर्नर्स, चटगांव विकिंग्स, ढाका ग्लॅडिएटर्स, जमैका, जमैका टलवाह, कराची किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, लाहोर कलंदर, लायन्स, मॅटाबेलेलॅन्ड टस्कर्स, मेलबर्न रेनगेड्स, पीसीए मास्टर्स XI, रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु, समरसेट, स्नॅनफोर्ड सुपरस्टार्स, सिडनी थंडर, वेस्ट इंडियन्स, वेस्ट इंडिज आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे.