ख्रिस केर्न्स करतोय सफाईचं काम!
By Admin | Updated: September 20, 2014 01:44 IST2014-09-20T01:44:21+5:302014-09-20T01:44:21+5:30
गर्दीतून गर्तेत जाणो म्हणजे काय, हे सध्या न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ािस केर्न्स प्रत्यक्ष अनुभवत आहे.

ख्रिस केर्न्स करतोय सफाईचं काम!
ऑकलंड : गर्दीतून गर्तेत जाणो म्हणजे काय, हे सध्या न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ािस केर्न्स प्रत्यक्ष अनुभवत आहे. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकणारा हा तारा आज आपल्या कुटंबाचे पोट भरण्यासाठी ट्रक चालवायचे आणि बस डेपोंच्या सफाईचे काम करीत असल्याचे खेदजनक वास्तव समोर आले आहे. दुसरीकडे, ‘मॅच फिक्सिंग’च्या आरोपावरून ब्रिटिश अधिकारी त्याची चौकशीही करीत आहेत.
न्यूझीलंडचा यशस्वी ‘ऑल राउंडर’ म्हणून ािस केर्न्स अजूनही ओळखला जातो. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत किवींकडून तो 62 कसोटी, 215 वन-डे आणि टी-2क् सामने खेळला आणि अनेक विजयांमध्ये त्याने मोलाचे योगदानही दिले. या कामगिरीबद्दल 2क्क्क् मध्ये विस्डेननं त्याला ‘क्रिकेटर ऑफ द इअर’चा बहुमान दिला होता; परंतु 2क्क्6 मध्ये निवृत्त झाल्यानंतर, आर्थिक परिस्थिती ढासळल्यानं आज या क्रिकेटवीरावर अक्षरश: मोलमजुरी करायची वेळ आली आहे. केर्न्सचा जवळचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू डीऑन नॅशने त्याच्या या अवस्थेबाबत माहिती दिली आहे. मॅच फिक्सिंगच्या सापळ्यात अडकल्यानं ािसच्या आयुष्याची घडी साफच विस्कटून गेली आहे. कोर्ट कचे:यांचा खर्च आणि बँक खाती गोठविण्यात आल्याने त्याला दोन वेळच्या जेवणासाठी आटापिटा करावा लागत आहे. म्हणूनच ऑकलंड कौन्सिलमध्ये तो बस डेपो स्वच्छतेचे काम करीत आहे. त्याबदल्यात त्याला ताशी 17 डॉलर पगार मिळतोय. त्यातूनच त्याच्या कुटुंबाची गुजराण होत आहे, असे ‘नॅश’ने एका वृत्तपत्रला सांगितले. (वृत्तसंस्था)
केर्न्सची पत्नी मेल क्रॉसर हिनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घर चालविण्यासाठी ािसला खूप मेहनत करावी लागत असल्याचे तिने सांगितले. घराचे भाडे, वेगवेगळी बिले आणि दोन वेळचे जेवण या गरजा भागविण्यासाठी त्याला ही नोकरी करणो भागच असल्याचे ती म्हणाली.
अर्थात, आर्थिक स्थिती नाजूक असतानाही, केर्न्स कुटंब ऑकलंडमधील सगळ्यात महागडय़ा उपनगरात राहत आहे. या सगळ्या दुष्टचक्रातून आपली कधी एकदा सुटका होते, याची केर्न्स कुटुंब आतुरतेने वाट पाहत आहे.