‘चोकर्स’चा डाग पुसणार : डोमिंगो
By Admin | Updated: March 16, 2015 23:54 IST2015-03-16T23:54:48+5:302015-03-16T23:54:48+5:30
वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीसाठी दक्षिण आफ्रिका संघ पूर्णपणे सज्ज आहे़

‘चोकर्स’चा डाग पुसणार : डोमिंगो
सिडनी : वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीसाठी दक्षिण आफ्रिका संघ पूर्णपणे सज्ज आहे़ या वेळी नक्कीच आफ्रिकन खेळाडू ‘चोकर्स’चा डाग पुसतील, असा विश्वास संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी व्यक्त केला आहे़
वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत लंका आणि आफ्रिका १८ मार्च रोजी आमनेसामने येणार आहेत़
डोमिंगो म्हणाले, ‘‘महत्त्वाच्या सामन्यात आफ्रिकन संघ दबावात येतो आणि पराभूत होतो, असा इतिहास आहे. मात्र, या वेळी आमचे खेळाडू
तसे होऊ देणार नाहीत़ वर्ल्डकपसाठी खेळाडूंनी खूप मेहनत घेतली
आहे़ विशेष म्हणजे, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आमचा संघ लंकेच्या तुलनेत
सरस दिसत आहे़ त्यामुळे या
सामन्यात आम्हीच वर्चस्व राखू यात शंका नाही़’’
भूतकाळात आफ्रिकन संघाला अनेक संधी आल्या होत्या;मात्र त्यांचे सोने करण्यात या टीमला यश
आले नाही. पण, आमच्या
खेळाडूंनी या चुकांपासून बोध
घेतला आहे़ आताचा संघ अधिक मजबूत दिसत आहे़ त्यामुळे लंकेविरुद्ध खेळाडू नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठा करून विजय मिळवतील, असा विश्वासही डोमिंगो यांनी
व्यक्त केला़ (वृत्तसंस्था)