बांगलादेशविरूद्धच्या कसोटीसाठी 'चायनामॅन' कुलदीप यादवची संघात वर्णी
By Admin | Updated: February 7, 2017 17:44 IST2017-02-07T17:43:18+5:302017-02-07T17:44:21+5:30
9 फेब्रुवारीला बांगलादेशविरूद्ध होणा-या एकमेव कसोटीसाठी चायनामॅन तरूण फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची संघात निवड

बांगलादेशविरूद्धच्या कसोटीसाठी 'चायनामॅन' कुलदीप यादवची संघात वर्णी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - 9 फेब्रुवारीला बांगलादेशविरूद्ध होणा-या एकमेव कसोटीत लेगस्पिनर अमित मिश्रा जखमी असल्यामुळे खेळू शकणार नाही. ट्वीट करून बीसीसीआयने याबबात माहिती दिली आहे. अमित मिश्राच्या जागी तरूण फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची संघात निवड झाली आहे.
कुलदीप यादवसाठी ही मोठी संधी आहे. कुलदीप हा डावखुरा चायनामॅन शैलीचा फिरकी गोलंदाज आहे. स्थानिक 22 सामन्यांमध्ये आतापर्यंत त्याने 81 विकेट घेतल्या असून 723 धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरूद्धच्या सराव सामन्यात त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. बांगलादेश संघ पहिल्यांदाच कसोटी सामन्यासाठी भारत दौ-यावर आला आहे.
NEWS ALERT - Kuldeep Yadav replaces injured Amit Mishra in #TeamIndia for Bangladesh @Paytm Test match #INDvBAN
— BCCI (@BCCI) February 7, 2017