चीनचा नेमबाजीत विश्वविक्रम
By Admin | Updated: September 23, 2014 05:51 IST2014-09-23T05:51:15+5:302014-09-23T05:51:15+5:30
चीनच्या महिलांनी आशियाई स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले़

चीनचा नेमबाजीत विश्वविक्रम
इंचियोन : चीनच्या महिलांनी आशियाई स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले़
ई़ सीलिंग, वु. लियुक्सी आणि चँग बिनबीन यांनी दहा मीटर एअर रायफलमध्ये एकूण १२५३़८ गुणांची कमाई करून सुवर्णावर ताबा मिळविला़ या खेळाडूंनी यापूर्वी झालेला १२५३़७ गुणांचा विक्रम मागे टाकला़ विशेष म्हणजे गत विक्रमही चिनी महिलांनीच तेहरान येथे झालेल्या स्पर्धेत नोंदविला होता़ या स्पर्धेत चीनची टीम एक वेळ सुवर्ण आणि विश्वविक्रमाला गमाविण्याच्या स्थितीत होती़ कारण क्वालिफिकेशन फेरीत चँग बिनबीन याची रायफल अयोग्य असल्याच्या कारणाने त्याला स्पर्धेत सहभाग घेण्यास बंदी घातली होती;मात्र चीनच्या टीमने याविरुद्ध अपील केले़ त्यानंतर पंचांनी चँग बिनबीनला खेळण्यास परवानगी दिली़ उत्तर कोरियाला भारोत्तोलनात दोन सुवर्ण आशियाई स्पर्धेत उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी भारोत्तोलनात उत्कृष्ट कामगिरी करून दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली़