चीनकडून भारत २-१ ने पराभूत
By Admin | Updated: September 25, 2014 03:41 IST2014-09-25T03:41:14+5:302014-09-25T03:41:14+5:30
भारतीय महिला हॉकी टीमला बुधवारी झालेल्या लढतीत चीनकडून १-२ ने पराभवाची नामुष्की ओढवली़

चीनकडून भारत २-१ ने पराभूत
इंचियोन : भारतीय महिला हॉकी टीमला बुधवारी झालेल्या लढतीत चीनकडून १-२ ने पराभवाची नामुष्की ओढवली़ या लढतीत भारतीय संघाने उत्कृष्ट सुरुवात करताना चीनच्या खेळाडूंवर अंकुश ठेवला़ पहिल्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल नोंदविता आला नाही़ मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनच्या लियांग मियू हिने १९ व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली़
भारताकडून २३ व्या मिनिटाला जसप्रीत कौर हिने गोल करताना संघाला १-१ अशी बरोबरी
साधून दिली़ यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ गोल नोंदविण्यात अपयशी ठरले़ मात्र चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये ५९ व्या मिनिटाला चीनच्या युदियाओ झाओ हिने गोल नोंदवून २-१ अशी आघाडी केली़ यानंतर
त्यांची हीच आघाडी कायम राखताना सामन्यात बाजी मारली़ भारताचा पुढचा सामना शुक्रवारी मलेशियाशी होईल़ (वृत्तसंस्था)