बुद्धिबळ
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30
सोनलला एकमेव आघाडी

बुद्धिबळ
स नलला एकमेव आघाडीराज्य बुद्धिबळ स्पर्धानागपूर : प्रतिभावान बुद्धिबळपटू सोनल मानधनाने येथे खेळल्या जात असलेल्या लक्ष्मीकांत इटकेलवार स्मृती महाराष्ट्र राज्य अंडर-१५ बुद्धिबळ स्पर्धेत रविवारी चौथ्या फेरीअखेर मुलींच्या विभागात एकमेव आघाडी घेतली आहे. स्पर्धेचे आयोजन नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या यजमानपदाखाली नैवेद्यम सभागृहात करण्यात आलेेले आहे. खुल्या गटात फिडे मास्टर आनंद नदार, निशित सिंग, विनय विटाळकर, सलील देवगडे आणि देवांश रत्ती प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.खुशी सुराणा, धनश्री राठी आणि आदिती पटेल प्रत्येकी साडेतीन गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. अव्वल पटावर खेळताना सोनलने सृष्टी पांडेचा पराभव केला. दुसऱ्या पटावर खुशी आणि धनश्री यांच्यादरम्यानची लढत बरोबरीत संपली तर तिसऱ्या पटावर अदिती पटेलने शरण्या अदानेचा पराभव केला. मुलांच्या विभागात अव्वल पटावर फिडे मास्टर आनंद नदारने प्रियांशू पाटीलचा पराभव केला. दुसऱ्या पटावर दुसऱ्या मानांकित निशित सिंगने वैभव राऊतचा तर ओम विटाळकरने साई श्रवणचा पराभव केला. सलील देवगडे विनित धूतचे आव्हान मोडून काढण्यात यशस्वी ठरला तर देवांश रत्तीने अमेया श्रीवास्तवचा पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)