चेन्नईच्या १५० धावा , युवराजच्या खेळीकडे लक्ष्य
By Admin | Updated: April 9, 2015 21:37 IST2015-04-09T21:32:33+5:302015-04-09T21:37:25+5:30
चेन्नई सुपर किंग्सविरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईने १५१ धावांचे आव्हान दिल्ली संघासमोर ठेवले आहे.

चेन्नईच्या १५० धावा , युवराजच्या खेळीकडे लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ९ - चेन्नई सुपर किंग्सविरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईने १५१ धावांचे आव्हान दिल्ली संघासमोर ठेवले आहे.
आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लागलेला युवराज दिल्लीकडून खेळणार असल्याने त्याच्या खेळीकडे त्याच्या चाहत्यांसह क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य लागले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकताच कर्णधार जेपी ड्यूमिनीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात चांगली झाली पण त्यानंतर चेन्नईला लागोपाठ दोन धक्के बसले. चेन्नईचे आघाडीचे फलंदाज मॅक्कूलम आणि सुरेश रैना प्रत्येकी ४ धावांवर बाद झाले. ड्यूप्लेसिस ३२ धावा, रवींद्र जाडेजा १७ धावा, ब्रॅव्हो ०१, आर आश्विनच्या नाबाद १२ धावा व कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या ३० धावांच्या जोरावर चेन्नईने ७ बाद १५० धावापर्यंत मजल मारली. दिल्लीकडून कल्टर निलने सर्वाधिक ४ तर जोसेफ, इमरान ताहिर, अमित मिश्रा आणि कर्णधार जेपी ड्यूमिनी यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले. दरम्यान, आयपीएल लिलावात तब्बल १६ कोटींची बोली लागलेल्या युवराज सिंगच्या खेळीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.