चेन्नईचा ‘सुपर’ विजय;

By Admin | Updated: May 25, 2014 04:31 IST2014-05-25T04:31:04+5:302014-05-25T04:31:04+5:30

बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीची अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. चेन्नईने बँगलोर संघाचा डाव ६ बाद १५४ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १७.४ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.

Chennai Super Super Series; | चेन्नईचा ‘सुपर’ विजय;

चेन्नईचा ‘सुपर’ विजय;

बँगलोर ८ गड्यांनी पराभूत बेंगळुरू : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर फॅफ ड्यूप्लेसिस (नाबाद ५४), महेंद्रसिंह धोनी (नाबाद ४९) आणि ड्वेन स्मिथ (३४) यांनी फलंदाजींमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा ८ गडी व १४ चेंडू राखून पराभव केला. चेन्नईचा हा या स्पर्धेतील नववा विजय ठरला. बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीची अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. चेन्नईने बँगलोर संघाचा डाव ६ बाद १५४ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १७.४ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथ (३४) व ड्यूप्लेसिस (नाबाद ५४) यांनी सलामीला ५७ धावांची भागीदारी करीत चेन्नई संघाला चांगली सरुवात करून दिली. स्मिथ माघारी परतल्यानंतर प्लेसिसने रैनाच्या (१८) साथीने धावफलक हलता ठेवला. रैना मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर ड्यूप्लेसिसने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (नाबाद ४९) साथीने तिसर्‍या विकेटसाठी ७५ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. त्याआधी, विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली असली, तरी बँगलोर संघाला केवळ ६ बाद १५४ धावांची मजल मारता आली. कोहलीने ४९ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व ५ षटकारांच्या साह्याने ७३ धावा फटकाविल्या, पण उर्वरित फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. चेन्नईतर्फे वेगवान गोलंदाज आशिष नेहराने ३३ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत बँगलोरचा डाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात रिली रोसोयू (१) आणि एबी डिव्हिलियर्स (१०) यांचा समावेश आहे. कोहलीचा अपवाद वगळता बँगलोर संघातील अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. कोहलीने पाचपैकी चार षटकार डीप मिडविकेटच्या क्षेत्रात लगाविले. कोहलीने चौथ्या विकेटसाठी युवराजसोबत ५५ धावांची, तर पाचव्या विकेटसाठी डिव्हिलियर्ससोबत ४२ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Chennai Super Super Series;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.