चेन्नई सुपरकिंग्जची अव्वलस्थानी झेप
By Admin | Updated: May 14, 2014 01:37 IST2014-05-13T20:18:34+5:302014-05-14T01:37:29+5:30
अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने राजस्थान रॉयल्सवर मात करत आयपीएलच्या सातव्या पर्वात गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली.
चेन्नई सुपरकिंग्जची अव्वलस्थानी झेप
राजस्थान रॉयल्सवर ५ गडी राखून मात
रांची : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद २६) आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा ५ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली. सुपरकिंग्ज संघाला विजयासाठी अखेरच्या २ षटकांत २५ धावांची गरज होती. धोनी व रवींद्र जडेजा (नाबाद ११) यांनी २ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला.
चेन्नईने राजस्थानचा डाव ८ बाद १४८ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.४ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. धोनीने १६ चेंडूंना सामोरे जाताना १ चौकार व १ षटकाराच्या साह्याने नाबाद २६ धावांची खेळी केली. जडेजाने ६ चेंडूंमध्ये नाबाद ११ धावांची खेळी करताना १ षटकार ठोकला. चेन्नई संघाच्या विजयात सलामीवीर ड्वेन स्मिथ (४४) आणि फॅफ ड्युप्लेसिस (३८) यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. या विजयासह चेन्नईने १० सामन्यांत १६ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. पंजाब संघ १४ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे तर राजस्थान संघाचे १० सामन्यात १२ गुण आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज :- ड्वेन स्मिथ झे. याज्ञिक गो. कूपर ४४, ब्रॅन्डन मॅक्युलम झे. नायर गो. अंकित शर्मा ०६, सुरेश रैना झे. भाटिया गो. अंकित शर्मा ०२, फॅफ ड्युप्लेसिस त्रि.गो. फॉकनर ३८, रविचंद्रन अश्विन त्रि.गो. भाटिया १४, महेंद्रसिंग धोनी नाबाद २६, रवींद्र जडेजा नाबाद ११. अवांतर (८). एकूण १९.४ षटकांत ५ बाद १४९. बाद क्रम : १-२०, २-४१, ३-७६, ४-१०५, ५-१२१. गोलंदाजी : अंकित शर्मा ४-०-२०-२, जेम्स फॉकनर ३.४-०-३७-१, प्रवीण तांबे ४-०-३४-०, केव्हिन कूपर ४-०-२५-१, रजत भाटिया ४-०-३०-१.