चेन्नई सुपर किंग्जचे वीस षटकांत ९ गडी बाद १६९ धावा
By Admin | Updated: April 30, 2015 21:41 IST2015-04-30T21:41:10+5:302015-04-30T21:41:10+5:30
मॅक्लम वगळता चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजांना चांगली सुरवात करता आली नाही. मधल्या फळीच्या फलंदाजांनी खेळ सावरत धावसंख्येचा डोंगर उभा केला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे वीस षटकांत ९ गडी बाद १६९ धावा
>ऑानलाइन लोकमत
कोलकाता, दि. ३० - नाणेफेक जिंकत कोलकाता नाइट रायडर्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
मॅक्लम वगळता चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजांना चांगली सुरवात करता आली नाही. मधल्या फळीच्या फलंदाजांनी खेळ सावरत धावसंख्येचा डोंगर उभा केला आहे. ब्रॅड हॉगने एका षटकात तीन गडी बाद केले. मॅक्लम, प्लेसीस व जडेजा या फलंदाजांना धावा करण्यापासून हॉगने रोखले. तर रसेल ब्राव्होला तीस धावांवर बाद केल तर, मोहित शर्माला भोपळान फोडताच तंबूत परतवले. त्याचप्रमाणे उमेश यादव, पियुष चावला व कमिन्सने प्रत्येकी एक गडी बाद केला. फक्त १३ चेंडूत चार चौकार व एक षटकार लगावत नेगीने २७ धावा करत सरते शेवटी खेळ सावरला. तर कोलकाता नाईट रायडर्समध्ये कमिन्सने सर्वाधिक म्हणजेच ५४ धावा दिल्या.