शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

चेन्नई स्मॅशर्स उपांत्य फेरीत

By admin | Published: January 14, 2016 3:15 AM

ख्रिस एडकॉक - पिया जेबादिया या मिश्र दुहेरी जोडीने बंगळुरु टॉप गन्स संघाच्या ट्रम्प लढतीत अश्विनी पोनप्पा - जे. एफ. नील्सी यांना पराभवाचा धक्का देताना चेन्नई स्मॅशर्सला ४-१ असे

बंगळुरु : ख्रिस एडकॉक - पिया जेबादिया या मिश्र दुहेरी जोडीने बंगळुरु टॉप गन्स संघाच्या ट्रम्प लढतीत अश्विनी पोनप्पा - जे. एफ. नील्सी यांना पराभवाचा धक्का देताना चेन्नई स्मॅशर्सला ४-१ असे विजयी केले. यासह चेन्नई संघाने पीबीएलच्या उपांत्य फेरीत दिमाखावत प्रवेश केला. त्याचवेळी दिल्ली एसर्स संघाने दणदणीत विजय मिळवताना मुंबई रॉकेट्सचा ५-० असा फडशा पाडून गुण तालिकेतील आपले अग्रस्थान पक्के केले.सामन्यातील पहिलीच पुरुष एकेरीची लढत चेन्नईची ट्रम्प होती. यामध्ये चेन्नईच्या सोनी ड्वी कुनकोरोने १५-१०, १०-१५, १५-८ असा झुंजार विजय मिळवत बंगळुरुच्या समीर वर्माला नमवले. यानंतर हून थिएन हाऊ - नील्सी यांनी पुरुष दुहेरीत चेन्नईच्या एडकॉक - प्रणव चोपरा यांना १५-७, १५-८ असा धक्का दिला. श्रीकांतने पुरुष एकेरीत चेन्नईच्या ब्राइस लीवरडेजला नमवून बंगळुरुला बरोबरी साधून दिली. यानंतर पीव्ही सिंधूने बंगुळुरुच्या सुओ डी को हिचा २-० असा धुव्वा उडवून संघाचा विजय जवळपास निश्चित केला. अखेरचा मिश्र दुहेरीचा सामना बंगळुरुची ट्रम्प लढत होती. मात्र यावेळी एडकॉक - जेबादिया यांनी बंगळुरुच्या अश्विनी - नील्सी यांना १५-१४, १५-१२ असे पराभूत करुन त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.दुसऱ्या बाजूला दिल्ली एसर्सने धमाकेदार विजय मिळवताना मुंबई रॉकेट्सला ५-० असे क्रॅश केले. या सामन्यात मुंबईने आपल्या ट्रम्प लढतीसह सर्व लढती गमावल्या. मात्र या पराभवानंतरही मुंबईने उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. बंगळुरुचा पराभव मुंबईच्या पथ्यावर पडल्याने त्यांनी उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली. हैदराबाद व बंगळुरु स्पर्धेबाहेर फेकले गेले. (वृत्तसंस्था)