चेन्नईला वगळलेले नाही : ठाकूर

By Admin | Updated: November 20, 2015 03:31 IST2015-11-20T03:31:22+5:302015-11-20T03:31:22+5:30

पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेपूर्वी चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमला काही अडचणींना सामोरे जावे लागत असले, तर चेन्नईचा आयोजन स्थळांमध्ये

Chennai is not exempt: Thakur | चेन्नईला वगळलेले नाही : ठाकूर

चेन्नईला वगळलेले नाही : ठाकूर

मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेपूर्वी चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमला काही अडचणींना सामोरे जावे लागत असले, तर चेन्नईचा आयोजन स्थळांमध्ये समावेश असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पुढील वर्षी ११ मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीबाबत बीसीसीआयच्या बैठकीनंतर ठाकूर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘आम्ही याबाबत सविस्तर चर्चा केली. काही केंद्रांना २५ आॅगस्टपर्यंत सज्ज असल्याचा अहवाल देण्याची सूचना करण्यात आली होती, पण आम्हाला अद्याप त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमबाबत काही अडचणी आहे. आम्ही त्याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Chennai is not exempt: Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.