चेन्नईचा राजस्थानवर १२ धावांनी विजय
By Admin | Updated: May 10, 2015 23:41 IST2015-05-10T21:56:28+5:302015-05-10T23:41:49+5:30
ब्रँडन मॅक्यूलमची खेळी व त्यानंतर गोलंदाजांचा अचूक मा-याने चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थानचा १२ धावांनी पराभव केला.

चेन्नईचा राजस्थानवर १२ धावांनी विजय
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १० - ब्रँडन मॅक्यूलमची खेळी व त्यानंतर गोलंदाजांचा अचूक मा-याने चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थानचा १२ धावांनी पराभव केला.
रविवारी चेन्नईत चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स हे तुल्यबळ संघ आमनेसामने असून प्ले ऑफमध्ये जागा पटकावण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईतर्फे सलामीवीर ब्रँडन मॅक्यूलमने ६१ चेंडूत ८१ धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. ड्वॅन स्मिथ, सुरेश रैना, पवन नेगी हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. फाफ डू प्लेसिसने २९ धावांची खेळी केली. शेवटच्या तीन षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनी ७ चेंडूत १३ तर ड्वॅन ब्राव्होने ८ चेंडूत १५ धावांची खेळी करत संघाला १५० टप्पा ओलांडून दिला. राजस्थानचा गोलंदाज ख्रिस मॉरिसने ४ षटकांत फक्त १९ धावा देत ३ विकेट घेत चेन्नईच्या फलंदाजांवर लगाम लावला.