ख्रिस गेलची झुंझार खेळी, गुजरातला 214 धावांचे आव्हान
By Admin | Updated: April 18, 2017 21:43 IST2017-04-18T21:43:48+5:302017-04-18T21:43:48+5:30
विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या वादळी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुने गुजरात लायन्सला 214 धावांचे आव्हान दिले आहे.

ख्रिस गेलची झुंझार खेळी, गुजरातला 214 धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 18 - विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या वादळी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुने गुजरात लायन्सला 214 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुने 20 षटकात दोन बाद 213 धावा केल्या.
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यात गुजरात लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने नेहमीप्रमाणे शानदार खेळी करत 38 चेंडूत सात षटकार आणि पाच चौकार लगावत 77 धावा केल्या. तर, कर्णधार विराट कोहलीने 50 चेंडूत एक षटकार आणि सात चौकारांची फटकेबाजी करत 64 धावा कुटल्या. या दोघांनी 63 चेंडूत संघाची धावसंख्या 100 पर्यंत गाठली. त्यानंतर ख्रिस गेलला गोलंदाज बासिल थम्पी याने पायचीत केले. तर, विराट कोहलीला धवल कुलकर्णीने झेलबाद केले. ट्रेविस हेडने नाबाद 30 धावा केल्या आणि केदार जाधव नाबाद 38 धावांची खेळी केली. तसेच, रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुला जादाच्या चार धावा मिळाल्या.
गुजरात लायन्सकडून गोलंदाज बासिल थम्पी आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी टिपले.