सनरायझर्स हैदराबादसमोर १६८ धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 4, 2015 21:34 IST2015-05-04T21:33:30+5:302015-05-04T21:34:35+5:30
गौतम गंभीर व रॉबिन उथप्पाने चांगली सुरुवातीनंतर कोलकात्याच्या फलंदाजांवर लगाम लावण्यात हैदराबाद सनरायझर्सच्या गोलंदाजांना यश आले असून त्यांनी कोलकात्याला २० षटकांत १६७ धावांवर रोखले आहे.

सनरायझर्स हैदराबादसमोर १६८ धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ४ - गौतम गंभीर व रॉबिन उथप्पाने चांगली सुरुवातीनंतर कोलकात्याच्या फलंदाजांवर लगाम लावण्यात हैदराबाद सनरायझर्सच्या गोलंदाजांना यश आले असून त्यांनी कोलकात्याला २० षटकांत १६७ धावांवर रोखले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हैदराबाद सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याचे सलामीवीर गौतम गंभीर व रॉबिन उथप्पा यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने ६.२ षटकांत संघाला ५७ धावांची सलामी दिली. गौतम गंभीर ३१ धावांवर असताना षटकार मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर उथप्पाही ३० धावांवर तर मनिष पांडे ३३ धावांवर बाद झाला. आघाडीचे तिन्ही फलंदाज माघारी परतल्यावर हैदराबादच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत कोलकात्याच्या मधल्या फळीतील फलंदाजांना फटकेबाजी करण्याची संधीच दिली नाही. अँड्रे रसेल १, रेन व जोहान बोथा हे फलंदाज झटपट माघारी परतल्याने कोलकात्याची अवस्था आणखी बिकट झाली. युसूफ पठाणने एकाकी झुंज देत १९ चेंडूत ३० धावा केल्या. या आधारे कोलकात्याने २० षटकांत ७ गडी गमावत १६७ धावा केल्या. हैदराबादतर्फे कर्ण शर्माने २९ धावांत दोन तर भुवनेश्वर कुमारे ४२ धावांमध्ये दोन विकेेट घेतल्या.