श्रीलंकेचे भारतासमोर जिंकण्यासाठी २७५ धावांचे आव्हान

By Admin | Updated: November 6, 2014 17:37 IST2014-11-06T17:34:09+5:302014-11-06T17:37:32+5:30

अँजलो मॅथ्यूजच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंककेने दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर जिंकण्यासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Chasing 275 to win against Sri Lanka in front of India | श्रीलंकेचे भारतासमोर जिंकण्यासाठी २७५ धावांचे आव्हान

श्रीलंकेचे भारतासमोर जिंकण्यासाठी २७५ धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ६ - कर्णधार अँजलो मॅथ्यूजच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंककेने दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर जिंकण्यासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणा-या श्रीलंकेची सुरूवात अडखळत झाली. मात्र संगकारा(६१) आणि मॅथ्यूजच्या (नाबाद ९२) खेळामुळे श्रीलंकेने २५० धावांचा टप्पा सहज पार केला. भारतातर्फे यादव, अश्विन आणि पटेलने प्रत्येकी २ तर जडेजाने १ बळी टिपला. 
कुसल परेरा(०), दिलशान (३५), जयवर्धन(४), प्रसन्न(१३), प्रियंजन(१), थिसारा परेरा(१०), रणदिव(१०) आणि प्रसाद (नाबा ३०) अशी श्रीलंकन खेळाडूंची धावसंख्या आहे. 

Web Title: Chasing 275 to win against Sri Lanka in front of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.