वेस्ट इंडिजसमोर जिंकण्यासाठी २६४ धावांचे आव्हान
By Admin | Updated: October 11, 2014 18:32 IST2014-10-11T18:31:30+5:302014-10-11T18:32:12+5:30
कोहली, रैना आणि कर्णधार धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजसमोर जिंकण्यासाठी २६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

वेस्ट इंडिजसमोर जिंकण्यासाठी २६४ धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - कोहली, रैना आणि कर्णधार धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजसमोर जिंकण्यासाठी २६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. ५० षटकांत भारताने ७ गडी गमावत २६३ धावा केल्या.
रहाणे(१२), धवन (१) आणि रायडू (३२) पटापट तंबूत परतल्यानंतर रैना(६२) व कोहलीने(६२) डाव सावरला. त्यानंतर धोनीने (नाबाद ५१) अर्धशतक झळकावत भारताला अडीचशेचा टप्पा पार करून दिला. वेस्ट इंडिजतर्फे टलरने ३ तर रामपाल, बेन, ब्राव्हो आणि सॅमीने प्रत्येकी १ गडी टिपला. जडेचा ६ तर कुमार १८ धावांवर बाद झाला.
विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाला कचखाऊ फलंदाजीमुळे पहिल्या सामन्यात १२४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विंडीज प्लेअर्स असोसिएशन आणि विंडीज बोर्ड यांच्यादरम्यान वेतनाच्या मुद्द्यावरील वादामुळे विंडीज संघ मालिकेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना पहिला सामना खेळण्यात आला. कॅरेबियन खेळाडूंनी हा वाद विसरून चमकदार कामगिरी केली.