राजस्थान रॉयल्स समोर २०१ धावांचे आव्हान
By Admin | Updated: April 29, 2015 21:42 IST2015-04-29T21:42:52+5:302015-04-29T21:42:52+5:30
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे पाच गडी बाद झाले असले तरीही त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना चांगलेच फटकारले आहे.

राजस्थान रॉयल्स समोर २०१ धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. २९ - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे पाच गडी बाद झाले असले तरीही त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना चांगलेच फटकारले आहे.
एक षटकार व एक चौकार मारत गेलने तडाखेबंद सुरवात केली. परंतू १० धावा झाल्या असताना सौथीच्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा हुडाने झेल घेतला. त्या पाठोपाठ बेंगळुरू संघाचा महत्वाचा फलंदाज विराट कोहली एक धाव करत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या ए.बी डिव्हिलिअर्सने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना सळोकी पळो करून सोडले. धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना डिव्हिलिअर्स धावचित झाला. तसेच मंदीप सिंग व कार्तिकने प्रत्येकी २७ धावा केल्या. सौथी व्यतिरिक्त धवल कुलकर्णी ने वीस ला बाद केले तर मंदीप सिंग बिन्नीच्या चेंडूवर पायचित झाला. अखेर पर्यंत ना बाद राहत सरफराज खान ने ४५ धावा केल्या तर हर्षल पटेलने सहा धावा केल्या.