राजस्थान रॉयल्स समोर १८१ धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 20, 2015 21:33 IST2015-05-20T21:33:03+5:302015-05-20T21:33:03+5:30
नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीस षटकात चार गडी गमावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने १८० धावा केल्या आहेत

राजस्थान रॉयल्स समोर १८१ धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० - नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीस षटकात चार गडी गमावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने १८० धावा केल्या आहेत. तडाखेबंद खेळी करत २६ चेंडूत २७ धावा केल्या. धवल कुलकर्णीच्या चेंडूवर त्रिफळा उडाल्याने तो बाद झाला. त्याचाजोडीदार असलेला कर्णधार विराट कोहली फक्त १२ धावांवर धवलच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ए बी डिविलिअर्सने मात्र राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. फक्त ३८ चेंडूत ४ चौकार व चार षटकार लगावत त्याने ६६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मनदीप सिंगनेही ५४ धावा करत, गोलंदाजांना दमवले. मोरीसच्या चेंडूवर खेळत असताना दिनेश कार्तिकेचा रहाणेकडे झेल गेल्याने त्याला अवघ्या आठ धावांत तंबूत परतावे लागले.