बंगळुरूसमोर 162 धावांचे आव्हान

By Admin | Updated: April 16, 2017 22:02 IST2017-04-16T22:02:16+5:302017-04-16T22:02:16+5:30

यपीएलमध्ये आज सुरू असलेल्या दुस-या लढतीत निर्धारित 20 षटकांत 8 बाद 161 धावा फटकावल्या आणि बंगळुरूसमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान ठेवले

Chasing 162 in front of Bangalore | बंगळुरूसमोर 162 धावांचे आव्हान

बंगळुरूसमोर 162 धावांचे आव्हान

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 16 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मा-यासमोर 7 बाद 130 अशी अवस्था झालेली असताना मनोज तिवारीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पुणे सुपरजायंट्सने आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या दुस-या लढतीत निर्धारित 20 षटकांत 8 बाद 161 धावा फटकावल्या आणि बंगळुरूसमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान ठेवले. बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठी यांनी पुण्याला दमदार सुरुवात करून दिली. पण बद्रीने रहाणेची (30) विकेट काढत पुण्याला पहिला धक्का दिला. त्यानंतर राहुल त्रिपाठीसुद्धा 31 धावा काढून बाद झाला.

दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने अडचणीत आलेला पुण्याचा डाव कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि महेंद्रसिंग धोनीने सावरला. दोघांनीही तिस-या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. मात्र धोनी (28) आणि स्मिथ (27) हे लागोपाठ बाद झाल्याने पुण्याचा डाव पुन्हा गडगडला. त्यानंतर डॅन ख्रिस्टियान, बेन स्टोक्स आणि शार्दुल ठाकूर यांनी सपशेल निराशा केल्याने पुण्याची अवस्था 7 बाद 130 अशी झाली. पण मनीष तिवारीने 11 चेंडूंत 27 धावा कुटत पुण्याला निर्धारित 20 षटकांमध्ये 8 बाद 161 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Web Title: Chasing 162 in front of Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.