लैंगिक समानतेला महत्त्व देत नेमबाजीमध्ये झाले बदल, महिला गटातील निशाणे वाढविण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:57 IST2017-12-19T00:57:22+5:302017-12-19T00:57:46+5:30
लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल टाकताना पुढील महिन्यापासून महिलांच्या स्पर्धेत नेमांची (टार्गेट) संख्या वाढवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) घेतला आहे. नवे नियम एक जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून हे नियम २०२० साली होणाºया टोकियो आॅलिम्पिकपर्यंत कायम राहतील.

लैंगिक समानतेला महत्त्व देत नेमबाजीमध्ये झाले बदल, महिला गटातील निशाणे वाढविण्यात येणार
नवी दिल्ली : लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल टाकताना पुढील महिन्यापासून महिलांच्या स्पर्धेत नेमांची (टार्गेट) संख्या वाढवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) घेतला आहे. नवे नियम एक जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून हे नियम २०२० साली होणाºया टोकियो आॅलिम्पिकपर्यंत कायम राहतील.
‘आयएसएसएफ’ने जाहीर केलेल्या एका पत्रकानुसार, ‘परिषदेने एक महत्त्वपूर्ण बदल केला असून आता महिलांच्या स्पर्धेत नेम वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता महिलांची स्पर्धा पुरुषांप्रमाणेच होईल. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेने २०२० सालापर्यंत खेळांमध्ये लैंगिक समानता आणण्याचे लक्ष्य बाळगले आहे आणि त्याच दृष्टीने आयएसएसएफने एक पाऊल टाकले आहे.’ या नव्या बदललेल्या नियमांनुसार आता महिलांच्या १० मीटर एअर रायफल आणि एअर पिस्तूल स्पर्धेत निशाणे वाढले असून त्यांची संख्या ४० वरुन ६० इतकी होईल. तसेच महिलांच्या ५० मीटर आणि ३०० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये निशाण२े २० वरुन ६० आणि ४० वरुन १२० इतके वाढविण्यात आले आहेत.