Chandoor Rail ITI selected in the state level Kabaddi competition | चांदूर रेल्वे आयटीआयची राज्यस्तरावरीय कबड्डी स्पर्धेत निवड

चांदूर रेल्वे आयटीआयची राज्यस्तरावरीय कबड्डी स्पर्धेत निवड

अमरावती : तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला अमरावती आयटीआयच्या भव्य प्रांगणात ८ जानेवारीला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत कबड्डी खेळात जिल्हास्तरावर जिंकुन अमरावती जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करणाºया चांदूर रेल्वे आयटीआयच्या संघाने अकोला संघाला गुरूवारी पराभूत करून पुन्हा एकदा विजय संपादन केले. त्यामुळे आता चांदूर रेल्वेची चमू औरंगाबाद येथे राज्यस्तरावर अमरावती जिल्ह्याचे कबड्डी खेळात प्रतिनिधीत्व करणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक वर्षांनंतर यंदा खेळ व तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे ठरविले होते. त्यामध्ये सर्वप्रथम संस्थास्तरावर व नंतर अमरावती येथे जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्यात. यामध्ये विजयी चमू व प्रशिक्षणार्थ्यांची निवड विभागस्तरावर करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अमरावती विभागाचे सहसंचालक एस. एस. उमाळे यांच्या हस्ते पार पडले. या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनपर समारंभात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, यवतमाळ डी.वी.ओ. बुटले, सहायक संचालक विकास शिरभाते, अनिल रेड्डीवार, नरेंद्र येते, अकोल्याचे प्राचार्य बंडगर आदींची उपस्थिती होती.

अमरावती विभागातील अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम व अमरावती येथील आय.टी.आय.चे शेकडो खेळाडू उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये कबड्डी स्पर्धेचा गुरुवारी निकाल लागला. विभागस्तरावरसुद्धा चांदूर रेल्वे आयटीआयची चमू अजिंक्य ठरली. अकोल्याची चमू उपविजेता ठरली. कबड्डी संघात क्षीतिज चिकटे, प्रज्ज्वल घाटोळे, तेजस देशमुख, केतन ठाकरे, गुलशन राठोड, आकाश मेहर, ओम शेलार, रोहन हुडमे, शुभम गोळे यांचा समावेश. या विजयी चमुसोबत व्यवस्थापक म्हणून पी. डी. पाचपोर, तर प्रशिक्षक म्हणून सुमित वलीवकर व शहजाद खान यांनी यशस्वीरीत्या भुमिका पार पाडली.

प्रशिक्षणार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे चांदूर रेल्वे आयटीआयचे प्राचार्य एस. एस. पाटबागे, गटनिदेशक डी.टी. शिंगणे, शिल्प निदेशक एच. यू. चांदूरकर, एन. एन. वसुले, के. के. सिसोदे, मारोती मर्दाने, पी. डी. पाचपोर, डी. एन. दहापुते, एस. एन. ठाकरे, कैलास चौधरी, जे. के. रंगारी, शहजाद खान, सूरज चांदूरकर, एस. टी. बेहेरे, सुमित वलीवकर, गजानन भडांगे, भूषण खेडकर, प्रशांत टांगले, एल. पी. शेलोकार, एस. एस. कांबळे, एस. व्ही. निमकंडे, कर्मचारी आत्राम, नंदकिशोर शेळके, राठोड, कनोजे, सारवाण, पाटील,  वाघमारे, सावंत, मोहोड आदींनी कौतुक केले.

रनिंगमध्येही राज्यस्तरावर

१०० मीटर रनिंग स्पर्धेत चांदूर रेल्वे आयटीआयचा वायरमन ट्रेडचा प्रशिक्षणार्थी तेजस देशमुख याने विभागीय स्तरावर विजय संपादन केले. औरंगाबाद येथे होणाºया राज्यस्तरासाठी त्याची निवड झाली आहे.

Web Title: Chandoor Rail ITI selected in the state level Kabaddi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.