दिल्ली डेअरव्हिल्सला १२० धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 12, 2015 21:58 IST2015-05-12T21:58:37+5:302015-05-12T21:58:37+5:30
चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत १२० धावांचे आव्हान दिल्ली डेअरव्हिल्स समोर ठेवले आहे.

दिल्ली डेअरव्हिल्सला १२० धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. १२ - चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत १२० धावांचे आव्हान दिल्ली डेअरव्हिल्स समोर ठेवले आहे.
स्मिथ व मॅक्लम या सलामीच्या फलंदाजांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. तर, सुरेश रैना ही ११ धावांवर बाद झाला. मधल्या फळीतील डु प्लेसीस ने २९ धावा केल्या परंतू, तो मोर्केलच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार महेंद्र सिंग धोनी झहीरच्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात २७ धावांवर नदिमकडे झेल गेल्याने बाद झाला. डु प्लेसीस व धोनी वगळता एकाही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. झहीर खान व मोर्केल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर, संधू व यादव यांनी एक एक गडी बाद केला.