केकेआर ला १५५ धावांचे आव्हान

By Admin | Updated: May 20, 2014 21:34 IST2014-05-20T21:34:09+5:302014-05-20T21:34:09+5:30

सीएसके ने चार गडी गमावत १५४ धावा केल्या असून कोलकात्याच्या मैदानावर केकेआरला १५५ धावांचे आव्हान दिले आहे.

Challenge KKR 155 runs | केकेआर ला १५५ धावांचे आव्हान

केकेआर ला १५५ धावांचे आव्हान

>ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. २० - सीएसके ने चार गडी गमावत १५४ धावा केल्या असून कोलकात्याच्या मैदानावर केकेआरला १५५ धावांचे आव्हान दिले आहे. नाणेफेक जिंकत केकेआर ने गोवंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्ज कडून सलामी वीर डि.आर. स्मिथ एका षटकात फक्त एक चौकार मारता आली जेमतेम पाच धावा करत त्याला तंबू गाठावा लागला. ब्रॅन्डन मॅक्लन ने चार षटकांमध्ये एकूण २८ धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार त्याने आजच्या सामन्यात लगावत क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतू सुर्यकुमार यादव ने झेल घेतल्याने त्याला तंबूत परतावे लागले. या सामन्यात सुरेश रैना ने उल्लेखनीय खेळी केली. तब्बल नऊ षटकात त्याने पाच षटकार व तीन चौकार लगावत ६५ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी व जडेजा या दोघांनी शेवट पर्यंत ना बाद राहत दमदार खेळी केली. 
 

Web Title: Challenge KKR 155 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.