दिल्ली डेअरव्हिल्सला १९० धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 3, 2015 21:38 IST2015-05-03T21:38:07+5:302015-05-03T21:38:07+5:30
अजिंक्य रहाणे व करुण नायर या दोन फलंदाजांनी सर्वाधिक धावांचा डोंगर उभा केला आहे. दिल्लीच्या गोलंदाजांना दाद न देता अजिंक्य रहाणेने

दिल्ली डेअरव्हिल्सला १९० धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - अजिंक्य रहाणे व करुण नायर या दोन फलंदाजांनी सर्वाधिक धावांचा डोंगर उभा केला आहे.
दिल्लीच्या गोलंदाजांना दाद न देता अजिंक्य रहाणेने ५४ चेंडूत ९१ धावा करत ऑरेंज कॅप वर शिक्कामोर्तब केले आहे. तर, करुण नायरने ३८ चेंडूत दोन षटकार व तब्बल सहा षटकार लगावत ६१ धावा केल्या आहेत. रहाणेच्या सोबतीला आलेल्या शेन वॉटसनने २४ चेंडूत २१ धावा केल्या. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असताना मॅथ्यूजच्या चेंडूवर केदार जाधवकडे झेल गेल्याने तो बाद झाला. आठ अतिरिक्त धावा मिळाल्या असल्यातरी रहाणे व नायरने आपल्या फलंदाजीच्या जोरावर १८९ धावांचा डोंग उभआ केला असून दिल्ली डेअरव्हिल्ससमोर वीस षटकांत १९० धावांचे आव्हान आहे.