वाल्के यांनी दिले बंदीला आव्हान
By Admin | Updated: March 2, 2017 00:29 IST2017-03-02T00:29:15+5:302017-03-02T00:29:15+5:30
फिफाचे माजी महासचिव जेरोम वाल्के यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या १० वर्षे बंदीविरुद्ध क्रीडा लवादात अपील केले

वाल्के यांनी दिले बंदीला आव्हान
दी लुसाने : फिफाचे माजी महासचिव जेरोम वाल्के यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या १० वर्षे बंदीविरुद्ध क्रीडा लवादात अपील केले आहे. विश्व फुटबॉल संघटनेने जानेवारी २०१६ मध्ये विश्वचषकाच्या तिकिटांची काळाबाजारी आणि संशयित टेलीव्हिजन कराराविषयी त्यांच्यावर बंदी लादली होती. वाल्के माजी फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्या कार्यकाळात फिफातील गैरव्यवहाराची चौकशी करणारया स्विस गुन्हेगारी एजेन्सीच्या निशाण्यावरदेखील होते. फिफाने याआधी वाल्के यांच्यावर १२ वर्षांची बंदी लादली होती; परंतु गेल्यावर्षी फिफा अपील समितीने ही बंदी दहा वर्षांची केली होती. क्रीडा लवादानुसार त्यांनी आता अपील समितीविरुद्ध क्रीडा लवादात याचिका दाखल केली आहे.