‘आयपीएल’मध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंना कडवे आव्हान: नबी
By Admin | Updated: April 8, 2017 00:58 IST2017-04-08T00:58:53+5:302017-04-08T00:58:53+5:30
‘आयपीएल’च्या या सत्रात सहभागी अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीच्या अनुसार ही स्पर्धा त्यांच्यासाठी आपले कसब दाखविण्याची सर्वांत नामी संधी आहे.

‘आयपीएल’मध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंना कडवे आव्हान: नबी
हैदराबाद : ‘आयपीएल’च्या या सत्रात सहभागी अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीच्या अनुसार ही स्पर्धा त्यांच्यासाठी आपले कसब दाखविण्याची सर्वांत नामी संधी आहे. या युद्धग्रस्त देशात प्रतिभा आहे, हे याद्वारे त्यांना दाखवून देता येईल. पत्रकारांशी बोलताना नबी म्हणाला, ‘मला आणि रशीद खानला ‘आयपीएल’मध्ये खूप अपेक्षा आहेत. घरचे प्रेक्षक आमची वाट पाहत आहेत. आम्ही चांगले प्रदर्शन करू, अशी अपेक्षा बाळगून आहोत. दोघांनाही ‘आयपीएल’च्या दहाव्या सत्रात हैदराबाद सनरायजर्सने खरेदी केले आहे. नबी म्हणाला, ‘आयपीएल’मध्ये चांगले प्रदर्शन करण्यासाठी रशीद आणि माझ्यापुढे मोठे आव्हान आहे. आमच्याकडे प्रतिभा आहे, हे जगाला दाखवून देण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटप्रती युवकांमध्ये उत्साह आहे. अर्थात या ठिकाणी फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. भारत कंधारमध्ये मैदान तयार करीत आहे. महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे अफगाणिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत.