मुंबईचे हैदराबादसमोर १५८ धावांचे आव्हान

By Admin | Updated: April 25, 2015 17:35 IST2015-04-25T17:35:20+5:302015-04-25T17:35:20+5:30

मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ८ गडी गमावत १५७ धावा केल्या आहेत

Challenge of 158 runs against Mumbai in Hyderabad | मुंबईचे हैदराबादसमोर १५८ धावांचे आव्हान

मुंबईचे हैदराबादसमोर १५८ धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - सात सामन्यांमध्ये सहा सामने हरणा-या मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ८ गडी गमावत १५७ धावा केल्या आहेत. सलामीवीर लेंडल सिमन्सने ४२ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या तर नंतरच्या षटकांमध्ये पोलार्डने २५ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या आणि मुंबईला चांगली धावसंख्या उभारून दिली. रोहीत शर्माने १५ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या परंतु मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला. मुंबई व हैदराबाद दोन्ही संघ या आयपीएलमध्ये अवघा एकेक सामना जिंकून इतरांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.
शेवटच्या षटकामध्ये भुवनेश्वर कुमारने पोलार्ड व विनय कुमारला बाद केले आणि मुंबईला चांगलाच धक्का दिला. भुवनेश्वर कुमारने चार षटकांमध्ये २६ धावा दिल्या आणि तीन बळी टिपले. मुंबईकडे चांगल्या गोलंदाजांची असलेली कमतरता लक्षात घेता धावांचे लक्ष्य हैदराबादसाठी फारसे कठीण नसेल अशी शक्यता आहे.

Web Title: Challenge of 158 runs against Mumbai in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.