चक दे गर्लने केले झहीरला क्लीन बोल्ड!

By Admin | Updated: April 24, 2017 22:34 IST2017-04-24T22:03:00+5:302017-04-24T22:34:45+5:30

भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा भारताचा माजी गोलंदाज आणि आयपीएलमधील दिल्ली डेअऱडेव्हिल्सचा कर्णधार झहीर खानची प्रेमाच्या मैदानात अखेर विकेट पडली

Chak De gaalal banana Zaheer clean bowled! | चक दे गर्लने केले झहीरला क्लीन बोल्ड!

चक दे गर्लने केले झहीरला क्लीन बोल्ड!

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24. - आपल्या भन्नाट यॉर्करवर भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा भारताचा माजी गोलंदाज आणि आयपीएलमधील दिल्ली डेअऱडेव्हिल्सचा कर्णधार झहीर खानची प्रेमाच्या मैदानात अखेर विकेट पडली. चक दे गर्ल सागरिका घाटगेच्या प्रेमात झहीर खान क्लीन बोल्ड झाला असून, झहीर आणि सागरिकाचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. झहीरने ट्विटरवरून सारगिकासोबतच्या वाड्निश्चयाची घोषणा केली.
 
भारताचा एकेकाळचा अव्वल डावखुरा गोलंदाज असलेला झहीर खान आणि सारगिका घाटगे एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा गेल्या काही काळापासून क्रिकेट आणि बॉलिवूडच्या वर्तुळात होती. त्यात हे दोघेही अनेक कार्यक्रमांमध्येही साथ साथ दिसून येत होते. युवराज सिंगच्या लग्नालाही हे दोघे जोडीने उपस्थित होते.  अखेर झहीरने आपल्या साखरपुड्याचे ट्विट करत सागरिकावरील आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. 
 
राजघराण्याशी संबंधित असलेल्या सागरिका घाटगेने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या असून, शाहरूख खानसोबत चकदे इंडिया या चित्रपटातील तिची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. मराठीतील प्रेमाची गोष्ट हा तिचा चित्रपटही बऱ्यापैकी गाजला होता. 
 

Web Title: Chak De gaalal banana Zaheer clean bowled!