चैन सिंगला आॅलिम्पिक तिकीट
By Admin | Updated: August 15, 2015 02:06 IST2015-08-15T02:06:33+5:302015-08-15T02:06:33+5:30
रियो कोटा मिळवणारा सातवा खेळाडू नवी दिल्ली : अजरबैजान येथील गाबाला येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी चषक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री

चैन सिंगला आॅलिम्पिक तिकीट
जागतिक नेमबाजी : रियो कोटा मिळवणारा सातवा खेळाडू नवी दिल्ली : अजरबैजान येथील गाबाला येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी चषक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये चैन सिंग याने आठवे स्थान पटकावले. या चमकदार कामगिरीसह त्याने आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त केला असून आॅलिम्पिक कोटा मिळवणारा तो सातवा भारतीय नेमबाज ठरला आहे.
स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये चैन याने चमकदार कामगिरी करताना १२०० पैकी ११७४ गुणांचा वेध घेताना सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर अंतिम फेरीमध्ये त्याने ४०३.७ गुणांचा वेध घेतला जो आॅलिम्पिक कोटा प्रवेश मिळवण्यासाठी पुरेसा होता. या कामगिरीमुळे मी खुप खुश असून देशासाठी आॅलिम्पिक पदक जिंकणे माझे स्वप्न आहे. या दिशेने पहिले पाऊल टाकले याचा अभिमान आहे. अजूनही मला कामगिरी उंचावण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता आहे, असे यावेळी चैनने सांगितले.
दरम्यान या स्पर्धेत चीनच्या के हुइ जिचेंग याने सुवर्णवेध घेताना स्पर्धेत वर्चस्व राखले. तर आॅस्ट्रीयाच्या अलेक्झांडर शमिरी आणि चीनच्याच के झू किनान यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला. (वृत्तसंस्था)