क्रिकेटमध्ये शतकांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 01:46 IST2015-07-28T01:46:19+5:302015-07-28T01:46:19+5:30
वर्ष २०१५ मध्ये आतापर्यंत केवळ सात महिन्यांचा कालावधी झाला असला तरी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वन-डे शतकांचा विश्वविक्रम नोंदवल्या गेला आहे.

क्रिकेटमध्ये शतकांचा वर्षाव
नवी दिल्ली : वर्ष २०१५ मध्ये आतापर्यंत केवळ सात महिन्यांचा कालावधी झाला असला तरी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वन-डे शतकांचा विश्वविक्रम नोंदवल्या गेला आहे. श्रीलंकेतील हंबनतोता येते रविवारी पाकिस्तान व श्रीलंका संघादरम्यान खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीत श्रीलंकेचा फलंदाज कुशल परेराने शतक झळकावित संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
परेराचे शतक यंदाच्या कॅलेंडर वर्षांत ८० वे वन-डे शतक असून हा एक नवा विक्रम आहे. केवळ १०१ वन-डे सामन्यांत या शतकांची नोंद झाली. एका कॅलेंडर वर्षांत हे सर्वाधिक शतके आहे. यापूर्वी २०१४ मध्ये एकूण ७९ शतके नोंदवल्या गेली. यापूर्वी २०१३ मध्ये वन-डे शतकांची संख्या ७७ होती तर २००७ मध्ये एकूण ७५ शतके नोंदवल्या गेली होती.
यंदाच्या कॅलेंडर वर्षात शतके झळकाविण्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. त्यांनी ८० पैकी एकूण १३ शतके झळकावली. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. या संघांच्या फलंदाजांनी प्रत्येकी ११ शतके ठोकली. भारत व इंग्लंडच्या फलंदाजांनी यंदाच्या कॅलेंडर वर्षांत प्रत्येकी ८ शतके झळकावली तर बांगलादेश व आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नावावर प्रत्येकी ६ शतकांची नोंद आहे.
पाकिस्तान व झिम्बाब्वेतर्फे प्रत्येकी ५ शतकांची नोंद झाली आहे तर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तीन शतके झळकावली. आयर्लंडतर्फे दोन शतकांची नोंद झाली असून स्कॉटलंड व संयुक्त अरब अमिरात संघातर्फे प्रत्येकी एक शतक नोंदवल्या गेले.
२०१५ मध्ये श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने सर्वाधिक ५ शतके ठोकले. त्यातील चार शतके विश्वकप स्पर्धेत नोंदविल्या गेली. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने चार शतके ठोकली. इंग्लंडचा जो रुट, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला, न्यूझीलंडचा केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी या कालावधीत प्रथ्येकी तीन शतके नोंदवली. भारतातर्फे रोहित शर्मा व शिखर धवन यांनी प्रत्येकी दोन शतके ठोकली. यंदाच्या मोसमात दोन द्विशतकाची नोंद झाली आहे. न्यूझीलंडचा
मार्टिन गुप्तील (नाबाद २३७)
आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल
(२१५) यांनी द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली. (वृत्तसंस्था)