सेंटर पॉईंट स्कूलला जेतेपद
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:15+5:302015-01-23T23:06:15+5:30
सेंटर पॉईंट स्कूलला जेतेपद

सेंटर पॉईंट स्कूलला जेतेपद
स ंटर पॉईंट स्कूलला जेतेपदनागपूर : विदर्भ जिमखाना आणि नाहतकर स्पोर्टस् इन्स्टट्यिूटच्या संयुक्त विद्यमाने मेकोसाबाग मैदानावर आयोजित ४२ व्या दादासाहेब कर्णेवार स्मृती आंतरशालेय १२ वर्षांखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत सेंटर पॉईंट स्कूलने विजेतेपदाचा मान मिळविला. अंतिम सामन्यात सेंटर पॉईंटने नारायणा विद्यालयाचा नऊ गड्यांनी पराभव केला.नारायणा संघाने २० षटकांत ८ बाद १०८ धावा उभारलया. सेटंर पॉईंटने हे लक्ष्य १३.५ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात सहज गाठले. सामनावीर ठरलेला मनन अग्रवाल याने नाबाद ६२ तसेच देवांश मिश्राने नाबाद २० धावा केल्या. सेंटर पॉईंटच्या प्राचार्य आणि शिक्षकांचे विजेत्या संघाला मार्गदर्शन लाभले.(क्रीडा प्रतिनिधी)............................................................................