शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॅरम : महाराष्ट्राच्या मुलांना सांघिक विजेतेपद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 18:03 IST

आकांक्षा कदम सब जुनिअर राष्ट्रीय विजेती

मुंबई : वाराणसी येथे झालेल्या उत्तर प्रदेश कॅरम ओसिएशन व वाराणसी कॅरम असोसिएशनच्या यजमानपदाखाली अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित सब जुनिअर राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या १४ वर्षंखालील गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा कदमने तामिळनाडूच्या आर. मोनिशाचा २१-०, १२-१० सहज असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. आकांक्षाच्या खेळामध्ये यावेळी चांगलाच आक्रमकपणा पाहायला मिळाला. कारण पहिल्या सेटमध्ये तिने मोनिशाला एकही गुण मिळवायला दिला नाही आणि हा सेट २१-० असा जिंकला. त्यावेळीच आकांक्षा हा सामना जिंकेल, असे वाटत होते. आकांक्षाने दुसरा सेटही १२-१० असा जिंकत जेतेपदाला गवसणी घातली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तामिळनाडूच्या एम. खाजिमाने तामिळनाडूच्याच एस अस्वीकाचा ९-०३, ११-२१, २१-४ विजय संपादन केला.    १४ वर्षंखालील मुलांच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या एन मिथुनने  उत्तर प्रदेशच्या मोईनुद्दीनचा १५-१, १४-१० असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर.  सिथिक राजा ( तामिळनाडू ) ने एम कौशिक ( तामिळनाडू ) याचा १९-५, १३-९ असा प्रभाव करून तिसरा क्रमांक पटकाविला. सांघिक गटात महाराष्ट्राच्या मुलांनी बाजी मारली महाराष्ट्राने तामिळनाडूचा २-१ असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशचा संघ विजयी ठरला त्यांनी पॉंडिचेरीचा ३-० असा सहज पराभव केला. मुलींच्या सांघिक अंतिम फेरीत मात्र तामिळनाडूच्या संघाने महाराष्ट्राला २-१ अशी हुलकावणी दिली. महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलींच्या सांघिक गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये बिहारने बाजी मारली. त्यांनी उत्तर प्रदेशला २-१ असे पराभूत केले. १२ वर्षाखालील कॅडेट मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या एस. नवीनकुमारने महाराष्ट्राच्या नीलांश चिपळूणकरचा ५-२०, २०-१९, २०-१८ असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. तर कॅडेट मुलींच्या एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या व्ही. मिथराने महाराष्ट्राच्या मधुरा देवळेवर १६-१०, १४-१२ असा सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला व या गटाचे विजेतेपद मिळविले. विजेत्यांना चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र