कॅरेबियन खेळाडूंचा विश्वविजेतेपदानंतरचा जल्लोष....
By Admin | Updated: April 3, 2016 23:33 IST2016-04-03T23:33:59+5:302016-04-03T23:33:59+5:30
विजयानंतर कॅरेबियन खेळाडूंनी आपल्या खास शैलीत विश्वविजेतेपदानंतरचा जल्लोष केला. १९७९ मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला पराजित करून विश्वविजेतेपद पटकाविले होते.

कॅरेबियन खेळाडूंचा विश्वविजेतेपदानंतरचा जल्लोष....
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ३ - शेवटच्या षटकात इंग्लडाचा ४ विकेटने पराभव करत थरारक विजव मिळत नवा कॅरेबियन खेळाडूंनी आज टी २०चे दुसरे विजेतेपद जिंकत इतिहास घडविला. विंडिजच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले मर्लोन सॅम्युअल्स(नाबाद ८५), डेव्हेन ब्राव्हो (३ बळी आणि २५ धावा) आणि कार्लोस ब्रेथवेट (३ बळी आणि ३४ धावा) यांच्या धमाकेदार खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने साहेबांना ४ विकेटने लोळवले. अखेरच्या ६ चेंडूत १९ धावा हव्या असताना ब्रेथवेट्ने तुफानी फलंदाजी करीत संघाला विजय मिळवून दिला. ब्रेथवेट्ने १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या.
विजयानंतर कॅरेबियन खेळाडूंनी आपल्या खास शैलीत विश्वविजेतेपदानंतरचा जल्लोष केला. १९७९ मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला पराजित करून विश्वविजेतेपद पटकाविले होते. या इतिहासाची डॅरेन सॅमी आणि कॅरेबियन संघाने पुनरावृत्ती केली. २०१२ मध्ये वेस्ट इंडीजने टी२० विश्वकरंडक पटकाविला होता. टी २०चे दोन विश्वकरंडक जिंकणारा कॅरेबियन संघ हा पहिलाच संघ आहे. एकदिवसीय सामन्याती पहिल्यांदा २ विश्वचषक आणि आणि टी २० चे २ विश्वचषक जिंकत कॅरेबियन संघाने केला अनोखा विक्रम
Dressing Room Celebration @henrygayle@darrensammy88@DJBravo47#WT20Finalpic.twitter.com/OnVip65uUr
— Manjeet Dahiya (@ManjeetDahiya20) April 3, 2016